Shrvaasanchya Paanavaril Akshare

119.00

खेळ भावनांचा, खेळ शब्दांचा, खेळ सृष्टीचा.

  • By: Vilas Yadavrao Kakalij
  • ISBN: 9789378210082
  • Price: 119/-
  • Page: 109
  • Size: 5×8
  • Category: Self-Reflection & Life Philosophy
  • Language: marathi
  • Delivery Time: 07-09 Days

Description

About The Book

खेळ भावनांचा, खेळ शब्दांचा, खेळ सृष्टीचा.

मनाच्या गाभाऱ्यात दाटून आलेल्या भावनांना शब्दरूप देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. हा कवितासंग्रह आहे, मुक्तछंदाच्या चौकटीतला. पण चौकट महत्त्वाची नाही, त्यातले अनुभव महत्त्वाचे.

निरीक्षणातून, अनुभूतीतून आणि जगण्यातून सुचलेले विचार, विषय, माणसं… जशी दिसली, जशी भिडली, तशीच कागदावर उतरवली आहेत. इथे अलंकारापेक्षा सत्य मोठं आहे.

लेखनाची खरी प्रेरणा मिळाली कै. ग. त्र्यं. गर्गे सरांकडून. त्यांचं एक वाक्य आयुष्यभर पुरलं: “कागद बोलला पाहिजे.”तुम्ही काय केलं, काय सोसलं, ते जग पाहत नाही. ते कागदावर मांडलं तरच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतं. हीच शिकवण मनात ठेवून मी लिहीत गेलो.

या प्रवासात मला आशीर्वाद लाभला आई यशोदाताई आणि वडील यादवरावांचा, गुरुजनांचा आणि सहचारिणी सौ. सुनिता उर्फ किर्ती हिच्या खंबीर साथीचा. प्रेमळ पुत्र उत्कर्ष आणि आदित्य हे तर माझं नशीबच. पाठीशी उभे राहिले बंधू कैलास आणि माया, लता, सुनंदा या भगिनी. अन् सूर लाभला मैत्रीचा – सुमन दौलतींचा.

हा माझा भावनांचा मुक्तछंदी खेळ कवितारूपात तुमच्यासमोर मांडतो आहे. तुमच्या-माझ्या जगण्यातलं प्रतिबिंब इथे दिसावं, तुमचा आनंद द्विगुणित व्हावा, याच एका प्रामाणिक हेतूने.

शब्दांचा हा प्रेमळ खेळ आपणास सादर… सस्नेह
अर्पण!

About The Author 

नाव – श्री. काकळीज विलास यादवराव
पात्रता – माध्यमिक शिक्षक( एम एस् सी बी एड्)
माध्यमिक शिक्षक (ना. शि. प्रसारक मंडळ नाशिक संचलित -व्ही जे हायस्कुल नांदगाव ता नांदगाव कार्यरत (२१ वर्षा पासून )
प्राथमिक शिक्षण जि. प्र प्राथमिक शाळा वाखारी
माध्यमिक शिक्षण कि.मा.विद्यालय वाखारी त्याच शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली
उच्च माध्यमिक शिक्षण म. स. गा. महाविद्यालय मालेगाव
आवड – लेखन ,वाचन
कथा,कविता संग्रह
लेखनाचा राज्यस्तरिय प्रमाण पत्र प्राप्त म. सा. पा. ता.नांदगाव सदस्य
राज्यस्तरिय पुस्तकात कथा ,कविता प्रकाशित. (गोष्टींचा पिटारा, कथांजली )
प्रतिलिपी ऑनलाईन प्लॅट फार्म वर लेखन
ऑथर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त
स्टोरी मिरर ऑनलाईन प्लॅट फार्म वर लेखन कथा, कविता
ऑथर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त
ऑन लाईन कविता लेखन स्पर्धा, सहभाग प्रमाण पत्र मेडल प्राप्त .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shrvaasanchya Paanavaril Akshare”

Your email address will not be published. Required fields are marked *