Just for You
₹349.00
प्रेम नेहमी पहिल्याच नजरेत ओळखता येतं का?
कधी कधी ते एक आकर्षण असतं… आणि मग प्रेम आणि आकर्षणात जी गल्लत होते.
- By : Swati Balurkar Deshpande, Sakhi
- ISBN: 9789378214585
- Price: 349/-
- Page: 228
- Size: 5×8
- Category: Romantic (LOVE STORY)
- Language: Marathi
- Delivery Time: 07-09 Days
Description
About The Book
प्रेम नेहमी पहिल्याच नजरेत ओळखता येतं का?
कधी कधी ते एक आकर्षण असतं… आणि मग प्रेम आणि आकर्षणात जी गल्लत होते.
ही कथा आहे एका तरुणीची—जिच्या मनात कॉलेजच्या दिवसांत तिच्या सरांविषयी एक न बोललेली ओढ निर्माण होते. त्या भावनांना ती प्रेम समजते. पण नियतीने तिच्यासाठी वेगळाच प्रवास ठरवून ठेवलेला असतो.
लग्नानंतर नव्या नात्यांत प्रवेश करताना ती अनेक अपेक्षा, स्वप्नं आणि काही अपूर्ण भावनाही घेऊन येते. नवऱ्याच्या स्वभावामुळे निर्माण होणारी दरी, एकटेपण आणि निराशा तिच्या मनाला छळतात. पण वेळ जसजसा पुढे सरकतो, तसतसं नात्यांचं खरं रूप उलगडत जातं.
समजुती, बदल आणि परस्परांच्या भावनांना ओळखण्याची तयारी—यातूनच तिच्या वैवाहिक आयुष्यात एक नवं, सुंदर नातं फुलतं. अनेक वर्षांनंतर जेव्हा ती पुन्हा त्या सरांना भेटते, तेव्हा तिला उमजतं की ते प्रेम नव्हतंच—ते फक्त एक क्षणिक आकर्षण होतं.
गैरसमज दूर करत, स्वतःला आणि नात्यांना नव्याने समजून घेत, ती पुढे आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत एक समाधानकारक, आनंदी आयुष्य जगायला शिकते.
About The Author
स्वाती बालूरकर देशपांडे, सखी या गेल्या तीस वर्षांपासून हिंदी शिक्षिका, विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कॉलेजात असताना लिखाणास सुरुवात, २०१८ पासून वेगवेगळ्या वेब पोर्टल आणि ऍप वर लिखाण करतात.
त्याचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत, ‘केली पण प्रीती’ आणि ‘पडसाद ‘. ही कादंबरी त्यांचे तिसरे पुस्तक आहे.
सध्या त्या हैदराबाद येथे वास्तव्यास असून प्रायव्हेट CBSE शाळेत हिंदी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.






Reviews
There are no reviews yet.